हिंदवी स्वराज्य सेनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

पाचोरा प्रतिनिधी । तालुका हिंदवी स्वराज्य सेना कार्यकारिणी नुकतीच जळगाव जिल्हा अध्यक्ष मोहन पाटील यांनी जाहीर केली आहे. 

यात पाचोरा तालुका अध्यक्षपदी पुनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सेनेची स्थापना करण्यात आली आहे. गडकिल्ले संरक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या आशिर्वादाने हिंदवी स्वराज्य सेना संस्थांपक अध्यक्ष परमेश्वर उर्फ महेश लंगर, उपाध्यक्ष खागेश देसले, यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य सेनेच्या शाखा उघडल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ह्या सेनेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर हिंदवी स्वराज्य सेनेची शाखा गावोगावी स्थापन करण्यात येणार आहेत. 

यात पाचोरा तालुका अध्यक्ष शरद कोळी, उपाध्यक्ष देविदास पाटील, पाचोरा तालुका सरचिटणीस भरत पाटील, पाचोरा तालुका सचिव म्हणून रुपेश वाघ, पाचोरा तालुका संघटक सुनिल सोनवणे, पाचोरा शहर अध्यक्ष पदी संदिप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच पाचोरा तालुक्यातील गावागावात जाऊन हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने शाखा उघडण्यात येणार आहेत अशी माहिती अध्यक्ष शरद कोळी यांनी दिली.

 

Protected Content