तपनभाई पटेल यांचे अपघाती निधन

जळगाव प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील उद्योगपती व नगरपालिकाचे बांधकाम सभापती तपनभाई मुकेशभाई पटेल (वय ३९) यांचे ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले. ते शिरपूर निम्स कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार (एमएच 18 एएक्स 8) च्या इंजिनचा स्फोट झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले.

शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र तर माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, शिरपूर नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होते.

Protected Content