कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिध्दारामैय्या !

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | खूप रस्सीखेच झाल्यानंतर अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पक्षाचे ज्येष्ठ नेते सिध्दरमैय्या यांची निवड करण्यात आली असून ते उद्या शपथ घेणार आहेत.

 

कर्नाटकात अलीकडेच झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने दणदणीत विजय संपादन केला होता. यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच निर्माण झाली होती. माजी मुख्यमंत्री सिध्दारमैय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात या पदासाठी मोठी स्पर्धा दिसून आली होती. शिवकुमार यांचा दावा यासाठी तगडा असला तरी आमदारांची पसंती ही माजी मुख्यमंत्री सिध्दारमैय्या यांना मिळाली. यासाठी आज अनेक बैठका झाल्या तरी तोडगा निघाला नव्हता.

 

दरम्यान, आज पुन्हा एकदा १० जनपथ येथे बैठक झाली. यात सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यात सिध्दारमैय्या यांच्या नावावर एकमत करण्यात आले. तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्वाची पदे देण्यात येणार आहेत. उद्या दुपारी साडेतीन वाजता सिध्दारामय्या यांचे मंत्रीमंडळ शपथ घेणार आहे.

Protected Content