लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेवून नाचणाऱ्या नवरदेवावर गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेन न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील भोईवाडा कॉर्नरजवळ लग्नाच्या वरातीत नवरदेवाने हातात तलवार घेऊन डीजेच्या गाण्यावर ताल धरत उपस्थित नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी नवरदेवासह डीजे चालक व इतर दोन विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील भोईवाडा परिसरात विकी गोपाल कोळी उर्फ अहिरे यांचे लग्न मंगळवारी १६ मे रोजी होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लग्नाची वरात जात असतांना नवरदेव विकी कोळी याने हातात तलवार घेऊन मित्रांसोबत नाचत होता. त्यावेळी एका हातात तलवार व दुसऱ्या हातात म्यान दाखवून आणि दोन समाजाता जातीय तेढ निर्माण होईल असे गाणे वाजवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र  निकुंभे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तथा नवरदेव विकी गोपाल कोळी, किरण गोपाल कोळी, डीजे चालक यशवंत शांताराम शिंगाने तिघे रा.  भोईवाडा अमळनेर आणि विकी भाऊलाल कोळी रा. शिरपूर या चार जणांना विरोधात अमळनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.

Protected Content