विद्यापीठातील दैनिक वेतनिक आणि कंत्राटी सेवकांचे मागण्यांसाठी आमरण उपोषण

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दैनिक वेतनिक आणि कंत्राटी सेवक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपणास कायम सेवेत सामावून घ्यावे या मागणीबाबत आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत त्यानी कुलगुरू यांना निवेदन दिले आहे. यापूर्वीही विद्यापीठाने वेळोवेळी कायम करण्यात येईल या संदर्भात स्पष्ट केलं होतं असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे मात्र कुठलीही कार्यवाही होत नसल्याने आमरण उपोषणाचा निर्णय दैनिक घेत असल्याचं उपोषण कर्त्यांनी सांगितलं

विद्यापीठात नियमित सेवा देण्यासाठी विद्यापीठाद्वारे अनेक समित्या गठीत करण्यात आल्या. समित्यांनी सेवा नियमित करणेबाबत अनेक अहवाल सादर केले. २००७ मध्ये विद्यापीठाने आश्वस्त केल्यामुळे न्यायालयात दाखल केलेली याचिका देखील मागे घेण्यास सांगितलं असं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र आजतागायत मागण्या मान्य न झाल्यानं दिनांक २१ फेब्रुवारी पर्यंत हे आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचं नमूद केलं आहे.

या निवेदनावर अण्णा भिल, शशिकांत चव्हाण, विश्वनाथ ठाकरे, भागवत पाटील, अशोक पाटील, कृष्णा बडगुजर, किशोर गाढे, युवराज पाटील, अशोक सैदाणे, विनायक पाटील, विजय माळी, विलास बाविस्कर, राजेंद्र महाले, चतुर्भुज पाटील, भिकन उंबरे, मंजूर शेख, सुदाम पाटील, प्रेमराज बाविस्कर, दगडू बिऱ्हाडे, सुरेश लोहार, मनोहर पाटील, अभिमन पाटील, प्रभाकर पवार, संजय पाटील, राजेंद्र पाटील, अंबालाल पाटील, किशोर भंगाळे, संजय पवार, शिवलाल चौधरी, धर्मराज पाटील, गंजीधर पाटील, प्रेमराज पाटील, गुलाब पाटील, चंद्रकिरण सपकाळे, दिलीप परदेशी, दिलीप गाडेकर, प्रकाश पाटील, किशोर पाटील, जयपाल कांबळे, राजाराम कोळी, प्रवीणकुमार पाटील, जितेंद्र महाडिक, शिवाजी पाटील, सोपान पाटील, गणेश पाटील, शरद बाविस्कर, योगेंद्र आरेकर, सुनील नन्नवरे, मुकुंदा सोनवणे, रितेश नन्नवरे, अरुण बिऱ्हाडे, रत्नाकर सोनार, सचिन बाविस्कर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहे.

Protected Content