विद्यापीठात ‘चीनचा दक्षिण चीन सागरातील विस्तारवाद’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षक आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘चीनचा दक्षिण चीन सागरातील विस्तारवाद’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या चर्चा सत्राच्या पहिल्या सत्रात तैवान स्थित डॉ.सनी हाश्मी यांनी चायनास लॉन्ग मार्च अट सी एक्सप्लेनिंग साऊथ चायना सी स्ट्रॅटेजि या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी चिनच्या विस्तारवादी धोरणाची कारणे आणि उद्देश यावर भाष्य केले. दुसऱ्या सत्रात ओ.पी.जिंदाल सोनिपत येथील नॉर्थ ईस्ट एशियन स्टडीज च्या संचालिका डॉ.अर्पणा पाठक यांनी अमेरिका आणि चीन यांचे दक्षिण चीन सागरात असलेले विविद आणि स्पर्धा तसेच अमेरिकेचे दक्षिण ची सागरात असलेले सामरिक हित यावर सविस्तर मांडणी केली.

 

चर्चा सत्राच्या शेवटच्या सत्रात द एशिया इन्स्टिट्युट दक्षिण कोरिया येथील संचालक डॉ. लखविंदर सिंग यांनी दक्षिण पूर्व अशियायी राष्ट्रांसोबत चीन चे सागरी विविद या विषयावर सखोल यांनी दक्षिण चीन सागरात चीन चे सागरी विविद या विषयावर सखोल मार्गदर्शन केले या चर्चा सत्राचे उद्घाटन सत्रात प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे हे प्रमुख अथिती उपस्थित होते. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात प्रशाळेचे संचालक डॉ.अनिल चिकाटे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ.तुषार रासयिंग यांनी केले. डॉ.सुभान जाधव यांनी आभार मानले. या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्रात विलास कुमावत व सचिन चव्हाण यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

Protected Content