आ. चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने जि.प. शाळेत शिक्षकांच्या नियुक्त्या

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघात येणार्‍या तिन्ही तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली आहेत.

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर या तीन तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत बर्‍याच दिवसांपासून शिक्षकांची पदे ही रिक्त होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा करून यासंदर्भात निवेदन देखील दिली होती. तसेच वेळोवेळी शिक्षण मंत्री यांच्याकडे देखील तगादा लावला होता व प्रशासनाला इशारा दिला होता की, शाळेची रिक्त पदे न भरल्यास शाळेला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, रावेर या तीन तालुक्यांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे.

गेल्या सुमारे दीड वर्षापासून ही शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यातील मुक्ताईनगर तालुक्यातीलच १३२ शिक्षकांची पदे ही रिक्त आहेत. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदार संघातील या शाळांना शिक्षक मिळालेले आहेत. पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे या शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली असून यामध्ये, मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील शिक्षकांची पदे भरण्यात आलेली आहेत.

यात मुक्ताईनगर तालुका :-
मराठी पदवीधर शिक्षक ६, उर्दू पदवीधर शिक्षक ३, मराठी उपशिक्षक ६५, व उर्दू उपशिक्षक ८.

बोदवड तालुका :-
१४ उपशिक्षक मराठी
७ पदवीधर शिक्षक मराठी
१ उपशिक्षक उर्दू

रावेर तालुका :-
५५ उपशिक्षक मराठी
३ उर्दू शिक्षक

अशा पद्धतीने रिक्त जागांवर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकाकडून आमदार चंद्रकांत पाटील यांचे कौतुक होत आहे.

Protected Content