मुक्ताईनगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साजरा केला मराठी भाषा गौरव दिन

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. शासकीय विश्राम गृह मुक्ताईनगर येथे आयोजित काक्र्यक्र्मात तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

आज रविवार, दि.२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शासकीय विश्राम गृह मुक्ताईनगर येथे साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील शिक्षकांचा शाल, श्रीफळ, गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक कथाकार डॉ.अ.फ.भालेराव होते, ‘मराठी भाषेचे जतन संवर्धन व्हावे. भाषा टिकवावी, रुजावी, यासाठी कार्य करायला हवं. माय मराठीचा जागर, अभिमान सातत्याने राखला गेला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे” असे या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.अ.फ.भालेराव यांनी आवाहन केले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, तालुका मधुकर भोई यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. प्रसंगी उपस्थितीत दिलीप पाटील, विकास पाटील, राजीव वंजारी, दिनेश शिर्के, उपशिक्षक भागवत दांडगे, दीपक झाल्टे, बारुते गुरुजी, छोटू भोई, दादुलाल भोई शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई, विधानसभा अध्यक्ष जनहित अतुल जावरे, राहुल वाघ, मंगेश कोळी, यश पाटील, आकाश कोळी, कमलेश पाटील आदी मनसे सैनिक पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रस्तावना मधुकर भोई यांनी तर कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन अतुल जावरे यांनी केले.

Protected Content