खेडी-कढोली येथे पोलीस भरती पुर्वी प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील निकम फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील गरीब व होतकरू तरूण व तरूणींसाठी एरंडोल तालुक्यातील कढोली येथे सोमवारी ८ फेब्रुवारी दुपारी आर्मी व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्राचे कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले. 

 याप्रसंगी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, मनसेचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम, मनसेचे रॉडो कॅबिनेट सदस्य जमिल देशपांडे, निकम फाऊंडेशने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, खेडी कढोली ग्रामपंचायतीचे प्रशासक विश्वास पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे म्हणाले की,  निकम फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणारा हा उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे, तसेच लहान वयातच मुलांना आर्मी व पोलीस भरतीचे मोफत प्रशिक्षण मिळाल्याने त्यांच्या मनात देशा विषयी प्रेम जागृत होत राहील. तसेच माझ्या परीने संबंधित निकम फाऊंडेशन यांना जे काही सहकार्य करता येईल ते मी करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भागवत रूले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद रूले यांनी मानले.

 

 

 

Protected Content