महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात कोरोना बाधित रुग्णांच्या सेवा करण्यासाठी राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी पुढे येत नसताना, या काळात जीवाची पर्वा न करता राष्ट्रहित लक्षात घेऊन कंत्राटी सेवा बजणाऱ्या कंत्राटी कामगारांनी आपली सेवा बजावली. त्यामुळे आता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

संपूर्ण जगात कोरोनामुळे महामारीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आला होता, अशा काळात कंत्राटी पद्धतीने नर्सेस, डाटा एन्ट्री, ऑपरेटर, सफाई कामगार, टेक्निशियन, फार्मसीस्ट, सुरक्षारक्षक, रुग्णवाहिका चालक, बेड सहाय्यक, वार्ड बॉय यांच्यासह इतरांनी सेवा बजावत कोरोना काळात काम केले. त्यानंतर त्यांना कामावरून काढण्यात आले. दरम्यान या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, या मागणीचे निवेदन आज गुरुवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आले.

याप्रसंगी अमोल कोल्हे, अविनाश चौधरी, भरत ससाने, निलेश बोरा दिलीप सपकाळे,वाल्मीक सपकाळे,सुरेश तायडे,साहेबराव वानखेडे,महेंद्र केदार,विजय करंदीकर यांच्यासह अविनाश चौधरी, निखील पाटील,उमाकांत विसपुते,विशाल महाजन, अक्षय जगताप, विशाल महाजन,सतीश सोनवणे, मनोज पाटील, अमोल चौधरी,मधुकर शिरसाळे,दिपाली नाईक,ज्योत्स्ना सुरवाडे, पल्लवी गवई,शिवानी दाभाडे, ऐश्वर्या सपकाळे,भाग्यश्री चौधरी,अर्चना शिरनाथ, पुजा माळी, जयवंत मराठे आदी कंत्राटी कोविड कर्मचारी सहभागी झाले होते.

 

Protected Content