मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारातील रेल्वे क्रॉसिंगजवळ अज्ञात ४ जणांनी दगडफेक करून दोन जणांचा मोबाईल आणि रेल्वे वॅगनचे अंदाजे २० हजार रुपये किमतीचे लोखंडी साईड डोअर असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरून नेल्याची घटना बुधवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील फेकरी येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे वॅगनचे अंदाजे २० हजार रुपये किमतीचे ९ लोखंडी साईट डोअर अज्ञात चोरट्यांनी उतरविले होते. दरम्यान ही माहिती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रच्या प्रशासनाला मिळाली. त्यानुसार कनिष्ठ अधिकारी अनिकेत चंद्रकांत काणेकर यांच्यासह दिलीप वना वराडे व राजेंद्र घनश्याम पाटील हे बुधवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाने फेकरी शिवारातील रेल्वे क्रॉसिंग जवळ आले.  त्यावेळी चोरी करून उतरवलेले लोखंडी साईट डोअर वाहनात लोड करत अतांना त्याठिकाणी अज्ञात ४ जणांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत दिलीप वना वराडे आणि राजेंद्र घनश्याम पाटील हे दोघे जखमी झाले असून  त्यांच्याकडील ८ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल हिसकावून पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे कनिष्ठ अधिकारी अनिकेत काणेकर यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री नऊ वाजता अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.

Protected Content