हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून दोन गटात वाद

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्रीमध्ये नाचण्यावरून वाद झाला यात एका ६० वर्षीय वृद्धास फावडयाच्या दांडाच्या मारहाणीत जबर जख्मी करून इतर दोन जणांना मारहाण केले असुन, तीन जणांना चौघांनी मारहाण जखमी केल्याची घटना घडली असुन, यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

या संदर्भातील मिळालेली माहीती की सांगवी खुर्द ता.यावल या गावात हळदीचा कार्यक्रम होता. लग्न आले म्हणजे वाजंत्री आली वाजंत्री आली म्हणजे नाचणाऱ्यांचा गोंधळ झाला. अशाच प्रकारे गावात एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता.  वाजंत्री नाचणारे व त्यात झालेल्या गोंधळ या मध्ये नाचण्यावरून वाद झाला व कल्पेश रमेश पवार, राहुल विजय सावळे, विनायक सुरेश पवार व केदार विजय सावळे रा. सांगवी खुर्द या चौघांनी नारायण बारकू चौधरी व त्यांची मुलगी प्रमिला विनोद पाटील, लहान मुलगा पंकज नारायण चौधरी यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी फावड्याच्या लाकडी दांडाने दुखापत केली व आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी व पोलीस करीत आहे.

Protected Content