Home Cities जळगाव जळगाव पंचायत समिती सभापतीपदी ललीता पाटील

जळगाव पंचायत समिती सभापतीपदी ललीता पाटील

0
112

जळगाव प्रतिनिधी | येथील पंचायत समितीवर शिवसेनेच्या ललीता पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जळगाव पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज पंचायत समितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार नामदेव पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी ललीता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

दरम्यान, ललीता पाटील यांची निवड जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी  शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound