प्रभाग समिती सभापती निवड; फुटीर गटाशीच भाजपचा संघर्ष

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या सभापतीसाठी १२ जुलै रोजी निवड करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज भाजपा फुटीर गट, भाजपा आणि एमआयएम या पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा फुटीर गटांतर्फे आज प्रभाग समिती १ साठी सचिन भिमराव पाटील, प्रभाग क्रमांक २ साठी प्रविण रामदास कोल्हे, प्रभाग समिती ३ साठी रेखा चुडामण पाटील, प्रभाग क्रमांक ४ साठी शेख हसीनाबी शेख शरीफ या चार जणांचे प्रभाग समितीच्या सभापतीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक २ साठी मुंकुद भागवत सोनवणे, प्रभाग क्रमांक ३ साठी धिरज मुरलीधर सोनवणे, प्रभाग क्रमांक ४ साठी उषाताई संतोष पाटील यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. तर एमआयएमच्या वतीने  प्रभाग ३ साठी देशमुख सुन्नाबी राजू यांनी देखील अर्ज दाखल केले आहे. १२ जुलै रोजी प्रभाग समिती सभापतीची निवड होणार आहे. 

याप्रसंगी फुटीर गटातर्फे  अर्ज दाखल करतांना उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेते ॲड. दिलीप पोकळे, उपगटनेते चेतन सनकत, सचिन पाटील, प्रविण कोल्हे, रेखा पाटील यांची उपस्थिती होती तर  भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी उपमहापौर अश्विन सोनवणे,  स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, कैलास सोनवणे, जितेंद्र मराठे, धिरज सोनवणे, दीपमाला काळे आदी उपस्थित होते.

Protected Content