ब्रेकींग : गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या चार ते पाच दिवसांपासून गुलाबराव देवकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून गुलाबराव देवकर यांनी आज मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपुर्वी म्हणजे शनिवारी ४ फेब्रुवारी रेाजी जिल्हा बँकेच्या संचालकांचे एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी गुलाबराव देवकर ही राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. जिल्हा बँकेत च्या निवडणुकीत शिवसेनेला दोन वर्ष तर राष्ट्रवादीला तीन वर्ष असा अध्यक्षपदासाठीचा फार्मूला ठरला होता. प्रत्येकी एक वर्षासाठी राष्ट्रवादीकडून नवीन व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाईल असा असा निर्णय झाला होता त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला असल्याची माहिती देवकर यांनी बोलताना दिली आहे.

अध्यक्षपदाकडे लक्ष
जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार, अ‍ॅड. रोहिणी खडसे यांची नावे चर्चेत आहेत. आता अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Protected Content