तुमचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी क्यूआर कोडची घ्या मदत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निवडणूक आयोगाने मतदाराच्या सुविधेसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ‘वोटर हेल्पलाईन अँप ‘ मधून जिथे असाल तिथून मतदान यादीत नाव समाविष्ट करू शकता. त्याचा फायदा हजारो नागरिकांना होतो आहे. आता मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे शोधण्यासाठी ना तलाठी सज्जावर जावे लागेल व्वा दुसऱ्या कुठल्या शासकीय कचेरीत जळगाव जिल्हा प्रशासनाने जागोजागी तुमच्या मतदार यादीत नावाची खात्री करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ लावले आहेत.

तुमच्या हातातला अँड्रॉइड मोबाईल मधून गुगल लेन्सला जाऊन कॅमेरा सुरु करून त्याच्या समोर धरा थेट निवडणूक आयोगाचे नाव शोधण्याचे पर्याय समोर येतील…. तुम्हाला अवघ्या काही सेंकदात तुमच्या नाव, मतदान केंद्र हे सगळं मिळणार आहे… त्यामुळे योग्य वेळ आताच आहे.. तुमच्या हातातला मोबाईलचा उपयोग करून मतदान यादीतील नावाची खात्री करून घ्या… आणि नाव नोंदवलं नसेल तर ताबडतोब वोटर हेल्प लाईन अँप ला जाऊन नाव नोंदवा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. याच्यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात येणार असून ज्यावर महिला कर्मचारी असतील. ‘क्यूआर’ कोड असलेले बोर्ड ९ तारखेपर्यंत सर्व आठवडी बाजार/सर्व ठिकाणी गर्दी असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. याचा उपयोग मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हावा हा बोर्ड लावण्यामागचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Protected Content