रेल्वे प्लॅटफार्मवर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनवरी प्लॅटफार्म क्रमांक ३ वर अनोळखी वृध्दाचा मयतस्थितीती मृतदेह गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक ३ वरील रेल्वे खंबा क्रमांक ४२० जवळ गुरूवारी १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अंदाजे ४५ ते ५० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी स्टेशन प्रबंधक यांनी रेल्वे पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानुसार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव रेल्वे पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र चौधरी करीत आहे.

Protected Content