बांधकामाच्या साहित्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आझाद नगर येथील बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोरून लोखंडी आसारीचे पिंजरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पिंपळा परिसरात आझाद नगरात अजित मेहबूब सय्यद (वय-३३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते बांधकाम व्यासायिक म्हणून काम करतात. त्यांच्या घराच्याजवळ कंपाऊंडच्या भिंतीला लागून आरसीसी कॉलमसाठी ५ लोखंडी आसारीचे पिंजरे ठेवण्यात आले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी ११ नोव्हेंबर १२ नोव्हेंबरच्या दरम्यान बाहेर ठेवलेले १० हजार ५०० रुपये किमतीचे लोखंडे आसारीचे ५ पिंजरे चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु मात्र याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे बुधवारी १५ नोव्हेंबरची दुपारी ४ वाजता त्यांनी रामानंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहे.

Protected Content