रेमंड चौफुलीजवळून दुचाकी व मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एमआयडीसीतील रेमंड चौफुलीजवळ एका मजूराची दुचाकी आणि मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईश्वर सुभाष घुगे (वय-४४) रा. चिंचोली ताजि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीबी ४११४) ने जळगाव एमआयडीसीतील रेमंड कंपनीजवळ आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी आणि मोबाईल चोरून नेला. त्यांनी दुचाकी व मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहे.

 

Protected Content