यावल येथे आणखी एका महिलेला कोरोनाची लागण

यावल प्रतिनिधी । शहरातील बारीवाडा परिसरात आज (दि. ९ फेब्रुवारी) रोजी एक महिला कोरोना बाधीत आढळुन आल्याने बाधीतांची संख्याही ११ वर पोहोचली असुन त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेस जळगाव येथील ईकरा कोवीड सेन्टरला दाखल करण्यात आले आहे. 

तथापि, शहरात काल एकाच कुटुंबातील आठ जण कोरोना बाधीत आढळुन आल्याने शहरात आणी परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली होती , प्रसिद्ध मॉलचे संचालक व त्यांचे डॉक्टर कुटुंब हे कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आले म्हणुन तात्काळ आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन त्यांचे हॉस्पीटल आणी मुख्य बाजारपेठेत असलेले त्यांचे मॉल त्वरित बंद करण्यात आले असता त्यांच्याबरोबर यावल शहरातील इतर व्यवसायींकांनी देखील अचानक आपली दुकाने बंद केली होती.

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता दोन दिवसापुर्वीच कोरोना बाधीत कुटुंबातील मरण पावलेल्या एका वयोवृद्ध महिलेचे उतर कार्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती या भितीपोटी त्यांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली असल्याचे वृत्त कळाले आहे. या कार्यक्रमात जर मोठ्‌या संख्येने नागरिक उपस्थित होते तर कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला अधिक काळजी घेवुन सर्तक राहावे लागणार आहे.यावलची रुग्ण संख्याही११ वर पहोचली असुन जिल्ह्याची रुग्णांच्या संख्येत यावल शहर हा क्रमांक एक वर दिसुन येत असुन , ही बाब आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी असुन , नागरीकांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजे असल्याचे आवाहन विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे.

 

Protected Content