यावल येथे महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार

यावल प्रतिनिधी । येथील यावल तालुका खरेदी विक्री शेतकी संघाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन या संघटनेची बैठक पार पडली असून यात महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन मधील नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ ब्राह्मणे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे स्वागत सत्कार करण्यात आले तसेच माई रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाध्यक्ष नितीन ब्राह्मणे व उपाध्यक्ष भूषण भाऊ नागरे यांच्या हस्ते करण्यात येवुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या बैठकीत यावल तालुक्यातील काही सदस्यांना महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनचे नियुक्तीपत्र देण्यात आले.सदरील कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनचे, जिल्हा सरचिटणीस योगेश अडकमोल, जळगाव जिल्हा संघटक घनश्याम निळे, यावल तालुकाध्यक्ष संजय तायडे, फैजपूर शहराध्यक्ष कैलास मेढे, यावल शहराध्यक्ष वसीम तडवी,यावल तालुका कार्याध्यक्ष विलास अडकमोल, यावल तालुका संपर्क प्रमुख प्रदीप वानखेडे, यावल तालुका संघटक मयूर जावरे, विलास सोनवणे तालुकाध्यक्ष जळगाव, नरेश मासुळे पोलीस पाटील मारुळ, महानगर कार्याध्यक्ष हेमंत सोनवणे, महानगर सचिव किशोर बावीस्कर, विलास सोनवणे मुंब्राबाद ग्रामपंचायत सदस्य, विलास अडकमोल सरपंच कोरपावली, अजय अडकमोल सरपंच दहिगाव, संदीप तायडे मारुळ ग्रामपंचायत सदस्य, सागर तायडे निंभोरा ग्रामपंचायत सदस्य, सोबत अनेक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content