लेवा विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा : खा. रक्षा खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर Muktainagar प्रतिनिधी । केंद्र व राज्य सरकारच्या नोंदणीतील एका अक्षराच्या स्पेलींगच्या चुकीमुळे लेवा पाटीदार समाजातील विद्यार्थ्यांचे होणार नुकसान टाळा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या जातींच्या सूचीमध्ये लेवा पाटीदारचे Leva Patidar Community इंग्रजी भाषांतर व्ही अक्षराने Leva असे नमूद केले आहे. तथापि केंद्र सरकारच्या जातींच्या सूचीमध्ये व्ही अक्षराऐवजी डब्ल्यू असे Lewa भाषांतर केले आहे. परिणामी ओबीसीत मोडणारे लेवा पाटीदार विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशावेळी खुल्या प्रवर्गात गणले जाऊन त्यांचे नुकसान होते, असे खासदार रक्षा खडसे M.P. Raksha Khadse यांनी लोकसभेत बोलतांना निदर्शनास आणले.

महाराष्ट्र राज्यातील लेवा समाजाचे विद्यार्थी ओबीसी Obc Reservation आरक्षणाचा फायदा घेऊन उच्च शिक्षणासाठी जसे इंजिनिअरिंग, मेडिकल, विधी अभ्यासक्रमांसाठी केंद्र सरकार संचालित संस्थांमध्ये अर्ज करतात. त्यावेळी केवळ चुकीच्या एका अक्षरामुळे ओबीसी आरक्षणापासून वंचित राहतात. रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये लेवा समाजाच्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील दोन वर्षांपासून या स्पेलिंगमध्ये बदल करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांमार्फत सामाजिक न्याय मंत्रालय व एनसीबीसी कमिशनला निवेदने देण्यात आली आहेत. परंतु त्यात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, ती तातडीने करण्याची मागणी केली.

दरम्यान, खासदार खडसे यांनी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला निवेदन केले, की इंग्लिश शब्द डब्ल्यूच्या जागी लवकरात लवकर दुरुस्ती करावी. जोपर्यंत त्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत Leva आणि Lewa दोन्ही शब्द एकाच जातीचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा देण्याच्या सूचना सर्व केंद्रीय संस्थांना त्वरित द्याव्यात. त्यामुळे यावर्षी लेवा समाजाचा ओबीसी आरक्षणासाठी पात्र कोणताही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे सांगितले.

Protected Content