शिरसाड येथे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मकबाबत कार्यशाळा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शनात्मक जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. न्यायमूर्ती विनोद. एस.डामरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

तालुक्यातील शिरसाड येथे पंचायत समिती व यावल न्यायलय यांच्या संयुक्त विद्यमाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर मार्गदर्शनात्मक जनजागृती कार्यशाळा शिरसाड ग्रामपंचायती माध्यमातून
कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायलयाचे न्यायाधीश विनोद एस. डामरे हे होते. कार्यक्रमास यावल तालुका विधी सेवा समितीचे सदस्य ॲड. देवेन्द्र बाविस्कर , ॲड. अजय कुलकर्णी , ॲड. अशोक सुरळकर तसेच शिरसाड ग्रामपंचायतचे सरपंच दिपक वामन इंगळे, उपरसरपंच राजू बन्सी सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील, ग्रा.पं. सदस्य तथा शाळा, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपाली सुभाष इंगळे, उपाध्यक्ष गणेश नामदेव बडगुजर, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवात राष्ट्रगीतानंतर दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे सत्कार तथा स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आलेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बालकांचे लैंगीक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम २०१२ अर्थात पोस्को कायद्याबद्दल उपस्थित विद्यार्थी व उपस्थितांचे सविस्तर मार्गदर्शन केले. कायद्याची पार्श्वभूमी, गरज, आवश्यकता, कायद्यातील तरतुदी, शिक्षा, याबाबत माहिती सांगितली. गुड टच आणि बॅड टच बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा २००५ सह अन्य महिला व बालक यांच्या हक्कांचे संरक्षण होणेकामी आवश्यक कायद्यांविषयी अनमोल माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी शाळा व परिसर पाहून आनंद व्यक्त करीत शिक्षकांचे अभिनंदन केले. मान्यवरांचे आभार शाळेचे शिक्षक दीपक वसंतराव चव्हाण यांनी मानले.

 

Protected Content