केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा खेळाडू राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षा उत्तीर्ण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ऑल इंडिया बुद्धिबळ असोशिएशन तर्फे आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेचे आयोजन  २०२१ -२२  मध्ये आयोजित करण्यात आले होते. या पंच परीक्षे साठी ५ दिवस रोज ८ ते ९ तास प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच्या अंर्तगत त्याची प्रक्टिकल परीक्षा व थेरी परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती.

या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला.  विद्यापीठ खेळाडू आकाश धनगर या परीक्षेत पास झाले असुन जळगाव जिल्हातील प्रथम सीनियर नँशनल आबिँटर झाले त्यानी जिल्हाचे नाव पंच परीक्षेत  उंचावले आहे. आता ते भारतात होणाऱ्या बुध्दिबळ स्पधँत आबिँटर म्हणुन काम करू शकतील त्याना नँशनल आबिँटरचा दजाँ देण्यात आला आहे.

यांनी केले अभिनंदन

प्राचार्य डॉ. अशोक राणे, उप-प्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा. निलेश जोशी, प्रा. प्रवीण कोल्हे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

 

 

 

 

Protected Content