नशिराबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अमळनेर, धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली. यावेळी संभाव्या उमेदवारांची आराखडा घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुका कशा जिंकता येतील व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य जास्तीत जास्त कसे निवडून आणता येतील यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जळगाव तालुकाध्यक्ष हेमंत कोळी, जळगाव तालुका सचिव भरत पाटील, तालुका उपाध्यक्ष उमेश धनगर, तालुका उपाध्यक्ष शैलेश चौधरी, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बऱ्हाटे, नशिराबाद शहर सचिव गोकुळ धनगर, धरणगाव तालुकाध्यक्ष हेमंत महाजन, धरणगाव तालुका सचिव राजू बाविस्कर, धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, अमळनेर तालुकाध्यक्ष संदीप पाटील, धरणगाव शहर अध्यक्ष धनंजय साळुंके, धरणगाव उपशहराध्यक्ष मुस्तफा खान, धरणगाव तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील आदी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content