बोहर्डी, शेंदुर्णी, किनगावमध्ये आरोग्य शिबिर ठरले ग्रामस्थांसाठी पर्वणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉक्टरांकडे जाण्याचा अनेकदा टाळाटाळ केली जाते किंवा रुग्णालय दूर असते त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अनेकांना परवडत नाही, ही समस्या लक्षात घेता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे वरणगाव नजीकचे बोहर्डी, शेंदुर्णी आणि किनगावमध्ये मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर ग्रामस्थांसाठी आरोग्याची पर्वणी ठरली.

वरणगावजवळील बोहर्डी येथे जि.प.शाळेत घेण्यात आलेल्या शिबिराप्रसंगी रेसिडेंट डॉ.सुशिल लंगडे, डॉ.वैभव फरके, डॉ.कल्पना देशमुख, डॉ.यशश्री देशमुख, डॉ.सुरुची शुक्‍ला, डॉ.आदिती वालीजकर, इंटर्न डॉ.मितेश दामले यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी १६७ ग्रामस्थांनी शिबिरस्थळी नोंदणी केली.

शेंदुर्णी शिबिराचा १९४ रुग्णांना लाभ 

शेंदुर्णीतील माहेश्वरी मंगल कार्यालयात भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात डॉ.प्रियंका भालके, डॉ.वैभव फरके, डॉ.अनुजा गाडगीळ, इंटन रुची वर्मा, समृद्ध देशमुख, डॉ.गोविंद यादव यांनी रुग्णांची तपासणी केली असून १९४ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. बोहर्डी आणि शेंदुर्णी शिबिरासाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पीआरओ विशाल शेजवळ यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

किनगाव शिबिरामुळे ग्रामस्थांना आनंद 

यावल तालुक्यातील किनगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण तज्ञ डॉक्टर आपल्या गावातच आल्याने ग्रामस्थांना असलेल्या विविध व्याधींचे निवारण झाले. याप्रसंगी डॉ.जुनेद कामेली, डॉ.वैभव फरके, डॉ.कल्पना देशमुख, डॉ.मोहम्मद, इंटर्न सईद, क्रिष्णा यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरासाठी दिपक पाटील, तुषार सुरे, मकरंद महाजन यांचे सहकार्य लाभले.

 

 

Protected Content