पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । नोकरी करीता माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फरजाबानेा इरफान शेख (वय-३९) रा. ताजबाब मास्टर कॉलनी जळगाव ह्या उच्च शिक्षित महिला आहेत. त्याचा विवाह इरफान शेख शफियोद्दीन शेख रा. मालेगाव यांच्याशी रितीरीवाजानुसार सन २०११ मध्ये झाला. लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांना पती इरफान शेख याने नोकरी साठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे अशी मागणी केली. त्यानंतर त्यांना मुलबाळ झाले नाही म्हणून सासू, दिर, नणंद यांनी शारिरीक व मानसिक त्रास देणे सुरू केले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीसात पतीसह इतर जणांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती इरफान शेख शफियोद्दीन शेख , सासून लतीफाबानो शफियोद्दीन शेख, दीर रिजवान शफियोद्दीन शेख, ननंद निखत उर्फ मोना शफियोद्दीन शेख आणि इतशत अजगर शेख सर्व रा. मालेगाव जि. नाशिक यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Protected Content