माजी सरपंच व पत्रकार यांच्यात घरकुलचे वृत्त संकलनावरून वाद

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे येथील घरकुला संदर्भातील बातमी संकलित करण्यासाठी गेलेल्या पत्रकार व कॅमेरामनला बांबू लाठ्या काठ्यांनी महाराण करत यांचेकडील कॅमेरा फोडल्याप्रकरणी परसाडे येथील सहा संशयीत आरोपींविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात दंगलीच्या गुन्ह्यासह प्रसार माध्यम अधिनियम २०१७ अन्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परस्परांकडून पत्रकार व कॅमेरामन यांनी महिला फिर्यादीस लोटालोटी करत तिच्या गळ्यातील १५ हजार रुपयाचे मंगळसूत्र तोडून नेल्याच्या फिर्यादीवरुन दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना शुक्रवारी दिनांक ६ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

तालुक्यातील परसाडे येथील ग्रामपंचायतीच्या घरकुला संदर्भातील बातमी संकलित करण्यासाठी फिर्यादी पत्रकार अशोकराज सुभाष तायडे राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे हे कॅमेरामन अमित तडवी, ओम रायकर यांचे सोबत परसाडे येथील पांढरी वस्तीवर इब्राहिम केशरा तडवी यांची मुलाखत चित्रित करत असताना संशयित आरोपी मजीत तडवी, अजित तडवी, राजू तडवी, सुपडू तडवी, रहमत तडवी आणि एक महिला यांनी बांबू काठ्यांनी मारहाण केली.

यात फिर्यादीच्या डाव्या हाताला दुखापत झाली तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या यासीन तडवी यांनाही मारहाण केली व कॅमेरामन यांच्या हातातील कॅमेरा फोडून त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले. झालेल्या झटापटीत पत्रकार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कुठेतरी पडून गहाळ झाली असल्याच्या फिर्यादीवरून सहा संशयितांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात दंगलीच्या विविध कलमानुसार प्रसारमाध्यमे अधिनियम २०१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधिक्षक अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सुनीता कोळपकर पुढील तपास करीत आहेत.

या प्रकरणात दुसर्‍या गटातील एका महिलेने फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, “स्पीड न्यूज पत्रकार तायडे व कॅमेरामन अमित तडवी राहणार सांगवी हे माझे पती मजीत तडवी १० ते १५ हजार रुपये घेऊन घरकुल मंजूर करतात अशा आशयाची मुलाखत इब्राहिम तडवी यांचेकडून घेत असताना माझे दीर राजू तडवी यांनी त्यास अशी मुलाखत का देता अशी विचारणा केली असता पत्रकार तायडे यांनी तुझ्या पतीस नोकरीवरून घरी बसवतो अशी धमकी देत लोटालोटी करत माझे गळ्यातील पंधरा हजार रुपये किमतीची काळ्या मण्याची सोन्याची पोत तोडून तिथून पळ काढला.” असे म्हटले आहे या फिर्यादीवरून म्हणून दोन संशयित आरोपी विरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content