आदिवासी समाज बांधवांचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘सावखेडा सिम’ येथे आदिवासी बांधवांचा सामुहिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात सहा जोडपे विवाह बंधनात बांधले गेले.

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील आदिवासी तरुणांच्या माध्यमातून आज शनिवार, दिनांक ७ मे २०२२ रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा आदिवासी जोडप्यांचे धार्मिक व पारंपारिक पद्धतीने विवाह लावण्यात आला. यावेळी आमदार शिरीष चौधरी, रमेश चौधरी, शेखर पाटील, प्रभाकर सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते वधुवरांना संसार उपयोगी भांडी व वस्तू भेट देण्यात आल्या.

याप्रसंगी वधु वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव, माजी पंचायत समितीच्या सदस्या मिना राजू तडवी,  यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहाँगीर तडवी, ग्राम पंचायतच्या सदस्या नसिबा तडवी, माजी ग्राम पंचायत सदस्य उस्मान तडवी, फैजपूर मंडळ अधिकारी हानिफ तडवी, आदीवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन तडवी, सलीम तडवी  यांच्यासह मोठया संख्येत समाजबांधव या सामुहिक विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

या सामुहिक विवाह सोहळयास यशस्वी करण्यासाठी ईगल ग्रुप, तडवी किंग ग्रुप, इंदीरा नगर बॉईज, सुखवस्ती ग्रुप, गुलाब नगर ग्रुप, पिएमसी क्रिकेट क्लब, लव किंग ग्रुप , मायकल वॉर्न क्रिकेट क्लब व सावखेडा सिम व परिसरातील आदिवासी तरूणांनी परिश्रम घेतले.

Protected Content