दुचाकीचा कट लागल्यावरून तरूणाला बेदम मारहाण; दोन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार अग्रवाल हॉस्पीटलजवळ घडला. याप्रकरणी दोन जणांवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील अग्रवाल हॉस्पिटल जवळील बोगद्याजवळून सचिन धनराज पाटील (वय-२६) रा. बालाजी पेठ जळगाव हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ ९४०२) ने कामानिमित्त एम.जे. कॉलेजकडे जात असतांना बोगद्याजवळ समोरून विश्वदिप कैलास सोनवणे (पुर्ण नाव माहिती नाही) यांची दुचाकी (एमएच १९ यू ३१४९) ला कट लागला. या कारणावरून विश्वदीप आणि सोबत डंपरचालक रत्नदीप (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी शिवीगाळ करून सचिन पाटील याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. जखमी सचिनला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सचिनच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रत्नदीप आणि विश्वदीप कैलास सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रदीप चांदेलकर करीत आहे.

Protected Content