फैजपूर येथील नरेंद्र नारखेडे यांना ‘खान्देश सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) ! येथील नरेंद्र नारखेडे यांना खान्देश सन्मान २०२१ या पुरस्काराने जळगावातील हॉटेल प्रेसीडेंट पार्क सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमात अभिजित खांडेकर व सरस्वती प्रतिष्ठानचे किशोर अहिरराव यांच्यासह खान्देशातील आलेले मान्यवर यांच्याहस्ते नरेंद्र नारखेडे व पत्नी सीमा नारखेडे यांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी नरेंद्र नारखेडे यांनी गेल्या ३५ वर्षात केलेले सहकार राजकिय व आध्यत्मिक सामाजिक कार्याची ध्वनी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती प्रतिष्ठान व सप्तरंग मराठी चॅनल यांनी केले होते. या कार्यक्रमात संपूर्ण खान्देशमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सहकार व आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातून नरेंद्र नारखेडे यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमास सिने अभिनेता अभिजित खंडकेकर, किरण पातोंडेकर, केशव भामरे, किशोर अहिरराव, संयोजक पंकज कासार यासह खान्देशातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारामुळे सार्वजनीक क्षेत्रात काम करायला ऊर्जा व प्रेरणा मिळते जनतेच्या प्रेमामुळे व सहकार्य मिळाले, यामुळे सार्वजनिक क्षेत्रात काम करू शकलो व त्यामुळे पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया नरेंद्र नारखेडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

Protected Content