फैजपूरातून एकाची दुचाकी लांबविली

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हॉटेल शिव मल्हार जवळून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद नारायण चौधरी (वय-५६) रा. श्रीकृष्ण नगर ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हे कामाच्या निमित्ताने ३० मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील फैजपूर शहरात दुचाकी (एमएच १९ डीबी ६९३०) ने आले होते. फैजपूर शहरातील हॉटेल शिव मल्हार जवळ त्यांनी दुचाकी पार्किंगला लावलेली होती. काम आटोपून दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी मंगळवारी ३१ मे रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे.

Protected Content