यावल येथे महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यशोगाथा अकॅडमी व चाणक्य अबॅकस अकॅडमीच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आले.

 

स्वच्छ भारत अभियान  महादेव मंदिर व यावल येथील स्मशान भूमी येथे राबवण्यात आले.  या अभियानामागे मुख्य उद्देश हा होता की,  विद्यार्थ्यांमध्ये व आपल्या परिसरातील सर्व नागरिकांमध्ये एक स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी. जसे की आपले यावल हे शहर स्वच्छता अभियानात  भारतात चौथ्या क्रमांकावर आले. त्याचप्रमाणे भविष्यात हा क्रमांक पुढच्या वेळेस पहिला किंवा दुसरा यावा यावर आपण सर्वांनी लक्ष देऊन आपल्या यावल या शहराला अतिशय स्वच्छ आणि सुंदर शहर निर्माण करावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजक यशोगाथा अकॅडमी व चाणक्य अकॅडमी चे संचालक उमेश धनगर  होते.  कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजू सुरणार  व सुहास भालेराव होते. याश्वितेसाठी कमलेश शिर्के, मोहन जयकारे, शुभम माळी, नईम शेख, अभय अडकमोल, गणेश मोरे ,कामिल तडवी, राहुल बोडे, कमलेश डांबरे, शरीफ तडवी, रोहन पारधे, सुमित गजरे, जयेश बारी, निशांत चौधरी, चैतन्य बारी, ललित बारी ,केतन वाघ, भूषण बारी, वैभव बारी आदींनी कामकाज पहिले.

Protected Content