पहूर पेठ ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियानात राज्यस्तरीय प्रथम उत्तेजनार्थ पुरस्कार

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ- सांगवी – खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रामविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार ,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ना. बाळासाहे पाटील आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ऑनलाईन पद्धतीने सरपंच नीताताई रामेश्वर पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय टेमकर यांना प्रदान करण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आज ५ जून २०२१ रोजी दुपारी साडे बारा वाजता ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला . हा सोहळा फेसबूक लाईव्ह द्वारे ग्रामस्थांनी अनुभवला .  ग्रामपंचायतीला  मिळालेल्या या राज्यस्तरीय  पुरस्कारामुळे पहूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे . यापूर्वी ही  पहूर पेठ ग्रामपंचायतीने  फुले, शाहू, आंबेडकर दलित वस्ती सुधार योजणेत सतत पाच वर्षे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून तर सन २०११ मध्ये फुले, शाहू, आंबेडकर दलित वस्ती सुधार योजणेत त्यावेळेस चे सरपंच व माजी जि. प.कृषी सभापती प्रदिप लोढा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनच्या  सहकार्याने  विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकवून मानाचा तुरा रोवला होता. 

2 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या माझी वसुंधरा अभियानात पहूर पेठ सांगवी खर्चाने ग्रुप ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन  वृक्षारोपण , जलसंवर्धन ,कंपोस्ट खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्प ,शोषखड्डे , प्रदूषण निर्मूलन , सायकल रॅली, वक्तृत्व स्पर्धा , जीवामृत प्रकल्प , घनकचरा व्यवस्थापन आदी पर्यावरण पूरक उपक्रम राबविले . अग्नी ,जल, वायू ,पृथ्वी, आकाश या पंचतत्वांवर  आधारित विविध उपक्रमांमध्ये गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

आज झालेल्या  ऑनलाइन सन्मान सोहळ्याअंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा सर्व ग्रामस्थांना पाहता यावा , यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात प्रोजेक्टरद्वारे स्क्रीनवर प्रक्षेपण दाखविण्यात आले . यावेळी जामनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी ,सहाय्यक गटविकास अधिकारी के . बी . पाटील , (ग्रा.प . ) अशोक पालवे,  संजय बैरागी, उपसरपंच श्याम सावळे , सरपंच पती रामेश्वर पाटील ,  माजी जि .प . सदस्य राजधर पांढरे , आर .टी . लेले हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी . पाटील सर  ,अशोक पाटील , इका पहेलवान ,  साहेबराव देशमुख , विकासो चेअरमन  किरण खैरणार , रविंद्र मोरे ,  शैलेश पाटील , किरण पाटील , चेतन रोकडे , शाकिर शेख , शरद पांढरे , ज्येष्ठ पत्रकार    शांताराम लाठे , भारत पाटील ,  पत्रकार शरद बेलपत्रे , गणेश पांढरे , रविंद्र घोलप , मनोज जोशी  ,  शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे , आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते . जिल्हा प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे , जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा तंत्रज्ञ सुनिल मोरे आदींचे संपूर्ण अभियानासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी  गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्या हस्ते पहूर पेठ चे  सरपंच नीताताई पाटील , उपसरपंच  श्याम सावळे , ग्राम विकास अधिकारी डी . पी . टेमकर ,  तंत्रस्नेही जीवन पाटील यांचा सत्कार करण्यात आला . यशस्वीतेसाठी शरद नरवाडे , शकिर तडवी , आबीद शेख , रतन नरवाडे , दिपक दौंगे यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले   

पुन्हा एकदा ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन   

पहूर पेठ ग्रामपंचायतीला सन २०११ मध्ये फुले, शाहू, आंबेडकर, दलित वस्ती सुधार योजणेत विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला होता त्यावेळेस ही व आता माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला व  आताही  ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर यांच्या कुशल मार्गदर्शन व सहकार्याकडून उत्कृष्ठ कामगीरी करून पहूर पेठ ग्रामपंचायतसाठी निश्चितच ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर लकी ठरले आहे.

 

 

 

 

Protected Content