बोदवड तालुक्यात भरारी पथकातर्फे कृषी केंद्रांची तपासणी

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात भरारी पथकाची स्थापन करण्यात आली असून आज बोदवड शहरातील विविध कृषी केंद्रांवर पथकातर्फे तपासणी करण्यात आली.

दरम्यान, या तपासणीवेळी विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली असून कायदेशीर पूर्तता न करणाऱ्या विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी बोदवड तालुका कृषी अधिकारी के.सी. पाडवी व  प .स कृषी अधिकारी राजू ढेपले यांनी दिली.

सन २०२२च्या खरीप हंगामास लवकरच सुरुवात होत असून बोदवड तालुक्या साठी एक लाख दहा हजार कापूस बियाणे पाकिटे आवश्यक असून,आजपर्यंत 80 हजार कापूस बियाणे पाकिटे विक्री केंद्रावर उपलब्ध झालेले आहे व यापुढे टप्प्याटप्प्याने कंपनीकडून विक्रेत्यांना बियाणे साठा वितरित करण्यात येणार आहेत. गुलाबी बोंड ळी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री १ जुनं नतरच करण्याबाबत परिपत्रक  काढले असून जे विक्रेते परीपत्रकाचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तसेच शेतकऱ्यांनी कापुस बियाणे लागवडीसाठी घाई करू नये, त्याचप्रमाणे १ जून नंतर अधिकृत बियाणे केंद्रावर पक्की पावती (बिल ) घेऊन बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी के.सी .पाडवी व पंचायत समितीचे राजू ढेपले, कृषी केंद्र तपासणीसाठी उपस्थित होते.

 

 

Protected Content