गॅस्ट्रोस्कोपी तपासणी सेवा आता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते गॅस्ट्रोस्कोपी युनीटचे लोकार्पण करण्यात आले.

आता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात वैद्यकीय तज्ञांकडून गॅस्ट्रोस्कोपीची तपासणी सेवा रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्ननलिका, जठर, आद्यांत्र यांची एंडोस्कोपीद्वारे केल्या जाणार्‍या तपासणीला गॅस्ट्रास्कोपी म्हणतात. वारंवार होणारा पित्ताचा त्रास,अन्नग्रहण केल्यानंतर छातीत होणार्‍या वेदना, भोजनानंतर ढेकरा बरोबर अन्नाचे अंश येणे, संडासच्या तपासणीमध्ये रक्ताचे अंश आढळणे, जठराचा कर्करोग, जठराच्या झडपांची तपासणी, जठराची सुज, आद्यांत्रमधील सुज किंवा अडथळे, स्वादुपिंडचे काही आजार, रक्ताच्या उलट्या होणे, कारण स्पष्ट नसताना आढळणारे रक्तपांढरी बेरियम मील तपासणी काही आक्षेपार्ह आढळल्यास, अन्ननलिकेतील दोष, अन्ननलिकेतील वाढलेल्या रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया, अन्ननलिकेत अडकलेल्या वस्तु काढण्याकरिता गॅस्ट्रोस्कोपी ही तपासणी केली जाते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात या सवर्र् तपासण्यांसाठी स्वतंत्र गॅस्ट्रोस्कोपी युनीटचे लोकार्पण डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. भूषण चोपडे, नर्सिंग महाविद्यालयाचे संकेत पाटील, मनीषा खरात, किर्ती पाटील, सर्जरीचे निवासी डॉ. श्रेयस सोनवणे, डॉ. अनिश जोशी, मेडीसीनचे निवासी डॉ. समाधान बाहेकर, डॉ. सुशील लंगडे, डॉ. आदीत्य नांदेडकर, डॉ. जुनेद कामेली, डॉ. प्रियंका भालके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खान्देशातील रूग्णांनी गॅस्ट्रोस्कोपी युनीटचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय प्रशासनाने केले आहे.

 

Protected Content