पुलावरून आयशर पलटी; सहा गंभीर जखमी ( व्हिडीओ )

yawal apghat

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील यावल-चोपडा मार्गावर असलेल्या नावरा फाटयावर असलेल्या नाल्याच्या पुलावर संरक्षण भिंतीला आयसर गाडीची जोरदार धडक दिल्याने खाली पडून आयशर पटली झाले. त्यात ६ आदीवासी बांधव जखमी झाल्याची घटना 6 वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की. रावेर तालुक्यातील उटखेडा, भातखेडा येथील आदीवासी बांधव हे लग्न झालेल्या मुलीचे मुळ पलटवण्यासाठी सुभेदार तडवी कुंडया पाणी येथे यांचेकडे गेले होते. आज दुपारपर्यंत त्यांनी आपले कार्यक्रम आटपुन ते उटखेडा भातखेडा ता. रावेर येथे परतीच्या मार्गावर निघाले असता यावल पासुन ६ किलो मिटर अंतरावर असलेल्या भोनक नदीच्या पुलाच्या संरक्षण भिंतीला आयसरची जोरदार धडक दिल्याने आयशर पलटी झाला. या अपघातात हसनुर फिरोज तडवी (वय-१७), सुहाना संजु तडवी (वय-१6), कबीर तडवी (वय-18), साहील निजाम तडवी (वय-20), सद्दाम सुपडु तडवी (वय-22), आणी रज्जाक इमाम तडवी (वय-23) या सहा आदीवासी बांधव गंभीर जखमी झाले.

आयसर ट्रक मध्ये 30-40 जण बसलेले होते. अपघात होताच ट्रक चालाक हा अपघात स्थळावरून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी सांगीतले, सर्व जखमींना प्राथमोपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त कळताच आदीवासी बांधवांची एकच गर्दी ग्रामीण रुग्णालयात दिसुन येत होती. यात राष्ट्रवादी आदीवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, डॉ. राजु तडवी, ग्रामसेवक मजीत अरमान तडवी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, आदी सामाजीक कार्यकर्त्यानी अपघातात जख्मी करीता मिळेल त्या मदतीचा प्रयत्न केला, अपघातातील उपचारासाठी डॉ. फिरोज एम. तडवी यांनी सहकार्य केले.

Add Comment

Protected Content