साकळी जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा (व्हिडीओ)

sakali news

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

यावेळी सरपंच सौ. सुषमा पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, साबिरा तडवी मुलांच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण तेली तसेच मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक परमान तडवी, मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सौ. मंगला सपकाळे, प्रभारी केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांचेसह शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीत ‘लेझीम ‘या पारंपरिक वाद्यांनी चांगलीत रंगत आणली होती तर लेझिम पथकाच्या मिरवणुकीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले होते. शाळेतही लेझीम पथकाने प्रत्यक्षिक सादर केले. या फेरीत, महापुरुषांच्या, देशभक्तांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुलींच्या शाळेचे शिक्षक सचिन धालपे यांनी केले. तर गावातून प्रथमच लेझिम पथकाच्या पारंपारिक वाद्यांनी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. आकर्षक व लक्षवेधी प्रभात फेरी व ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दोघा शाळांमधील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

जि.प.सभापतींकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
सदरील शाळेत विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक सुरू असतांना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी शाळेला भेट दिली. अतिशय शिस्तबद्ध व लयबद्ध तालासुरात सुरु असलेल्या लेझीम प्रात्यक्षिकांचे तोंड भरून कौतुक केले व विद्यार्थ्यांना रोख बक्षिसी दिली. यावेळी दोघा शाळांच्या वतीने सभापती रविंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत यावल कृऊबाचे संचालक विलास पाटील, विलास पवार तसेच मुलांच्या शाळेचे शिक्षणप्रेमी सदस्य नितीन फन्नाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content