Home क्राईम धारदार सुरासह फायटर बाळगणाऱ्यासह अटक !

धारदार सुरासह फायटर बाळगणाऱ्यासह अटक !

0
34


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल येथे संशयास्पद रित्या हातात लोखंडी सुरा आणि फायटर घेवून फिरणाऱ्या चौघांवर यावल पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल गावात संशयास्पदरित्या गावात हातात लोखंडीसुरा आणि फायटर घेवून चार जण फिरत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत संशयित आरोपी जयेश काशिनाथ भालेराव (वय-३०), समिर मुकेश देशमुख (वय-३०), रोहीत मधुकर लोखंडे (वय-२१) आणि विशाल चंद्रकांत भालेराव (वय-२१) रा. भालोद ता. यावल यांच्यावर कारवाई केली. यात चौघांची तपासणी केली असताना विशाल भालेराव याच्याकडे लोखंडी सुरा आणि फायटर आढळून आला. याप्रकरणी विशाल याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.


Protected Content

Play sound