ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची साडेपाच लाखांमध्ये फसवणूक

सावदा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची ५ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा घटना समोर आली आहे. या संदर्भात सावदा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक शेख शोएब शेख असलम (वय-२५) हे केळी खरेदी आणि विक्रीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता सावदा गावातून ट्रक क्रमांक  (आरजे ११ जीए ८०००) यामध्ये १८ टन ७५० किलो वजनाची केळी एकूण ५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा केळीचा माल भरून सावदा येथून आग्रा येथे रवाना झाला. यात ट्रक चालक बल्लू सुंदर कुरेशी रा. फतेहाबाद आणि हरिओम जोरावरसिंग रा. आग्रा, उत्तर प्रदेश दरम्यान हा ट्रक आग्रा येथे न पोहोचता त्याची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावल्याची घटना समोर आले आहे. या संदर्भात ट्रान्सपोर्ट व्यवसायिक शेख शोएब शेख अस्लम यांनी सावदा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेला तक्रारीवरून संशयित आरोपी बल्लू कुरेशी आणि हरिओम जोरावरसिंग या दोघांविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनवर तडवी करीत आहे.

Protected Content