कारण नसतांना रिक्षा चालकाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगर भागातील अंबिका किरणादुकानाजवळ एका रिक्षा चालकाला काहीही कारण नसतांना दमदाटी करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना रविवारी २८ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करणत आला आहे. शेख सलीम शेख गुलाब (वय-४८) रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा, जळगाव असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापूरा भागात शेख सलीम शेख गुलाब हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. रविवारी २८ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते समता नगरात प्रवाशी घेवून गेले. यावेळी काही दोन ते तीन इसमांनी त्यांची रिक्षा थांबवून त्यांना तु इतक्या जोरात रिक्षा का चालवित आहे, तुला माहिती नाही का मी इथला डॉन आहे असे म्हटले. यावेळी रिक्षा चालकांनी त्या इसमांची समजूत काढून प्रवासी सोडण्यासाठी निघून गेले. प्रवासी सोडल्यानंतर ते परतत असतांना त्या इसमांनी एक रिक्षा रस्त्यात लावली. यावेळी रिक्षा चाल शेख सलिम यांनी त्यांना रिक्षा बाजूला करण्यास सांगितले असता, त्यांनी शिवीगाळ करुन रिक्षा चालकाची कॉलर पकडून त्यांना बाहेर ओढत चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण करणार्‍या इसमांपैकी एकाने लोखंडी रॉड रिक्षा चालक शेख सलिम यांच्या कानावर मारला. त्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, त्यांनी हात अडवून तो वार अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. याप्रकरणी सोमवारी २९ मे रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content