नेरीनाका कासमवाडी परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरीनाका कासमवाडी येथील प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटलजवळून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भिवाराम मामराज जांगीड (वय-३०) रा. नवनाथ नगर, सावखेडा शिवार, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फर्निचरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता भिवाराम जांगीड हे दुचाकीने (एमएच १९ बीझेड ५५०८)ने जळगावातील नेरी नाकाजवळील प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे कामाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भिवाराम याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळाली नाही. अखेर रविवारी २८ मे रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Protected Content