केसीईमध्ये डॉ. जी.डी. बेंडाळे शिष्यवृत्तीचे वाटप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईमध्ये दरवर्षी प्रमाणे सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ जी.डी. बेंडाळे यांच्या सहचारिणी शालिनी ताई बेंडाळे यांनी दिलेल्या देणगीतून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते यंदाही गुरूवर्य प. वि. पाटील विद्यालय व ए. टी. झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

 

गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते या शिष्यवृत्ती चे वितरण केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी व शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. इंद्रायणीताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. दोघं शाळांतील एकूण 32 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका रेखा पाटील व प्रणिता झांबरे यांनी केले तर  एकनाथ पाचपा॑डे सर तसेच कल्पना तायडे व  योगेश भालेराव सर यांनी सहकार्य केले.

Protected Content