डोंगर कठोरा येथे खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्घाटन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर डोंगर कठोरा येथे न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्घाटन युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे व जिल्हा परिषदच्या सदस्या साविता भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील हे होते. तसेच स्पर्धेत परिसरातील एकूण २० संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या क्रिकेट स्पर्धत अंतिम विजेत्या संघाला प्रथम बक्षीस ११ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे. तर अंतिम सामन्यातील उप विजेता संघाला द्वितीय बक्षीस ५ हजार १ रुपये देण्यात येणार आहे.

डोंगर कठोरा गावातील युवकांच्या या न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लबतर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कुंदन फेगडे, यावल पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, सलीम तडवी, उदय बाउस्कर, डोंगर कठोरा गावाचे प्रथम नागरिक सरपंच नवाज तडवी, सामाजिक कार्यकर्त अजय भालेराव आदी मान्यवर व ग्रामस्थ मंडळी यांच्यासह दिलीप तायडे, नितीन भिरूड, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, पत्रकार राजू आढाळे, ग्राम पंचायत सदस्य आशा आढाळे, राहुल आढाळे, जुम्मा तडवी, दगडू तायडे, रवींद्र भालेराव, रवींद्र सोनवणे, रवींद्र आढाळे, अजय तायडे, विकी पांडव,  ज्ञानेश्वर आढाळे, मिलिंद आढाळे, नरेंद्र सोनवणे, अनिल लोहार, आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आयोजक संजय आढाळे, बुद्धभूषण आढाळे, नयन ढोके, अरविंद पांडव हे परिश्रम घेत आहे.

 

 

Protected Content