Home धर्म-समाज पाचोऱ्यात संत रविदास महाराजांची जयंती साजरी

पाचोऱ्यात संत रविदास महाराजांची जयंती साजरी

0
31


पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांच्यावतीने संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी पत्रकार, नगरसेवक यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील यांनी आपले मत व्यक्त करतांना, “संत रविदास महाराज यांचे विचार सर्वांनी आत्मसात करुन कार्य केले पाहिजे.” असे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी यांनी आपले विचार मांडताना, “संतांचे गुण सर्वांनी अवलंबले तर नागरिकांची व देशाची प्रगती होईल. त्यांच्या विचारातून आपण प्रेरणा घेऊन कार्य करायला हवे.” असे मत मांडले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अनिल येवले, प्रमोद पाटील, नंदकुमार शेलकर, नगराज पाटील, सुनिल पाटील, नाना महाजन, गोवर्धन जाधव, विनोद अहिरे, विकास पाटील, लक्ष्मण सूर्यवंशी, रईस बागवान, विकी मराठे, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कॄषी उद्योजक विशाल नेवे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound