साकळीत आरोग्य सभापती व तहसीलदार यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण

 

 

 यावल : प्रतिनिधी  । तालुक्यातील साकळी येथे  माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत सर्वेक्षण सुरू असताना जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती  रविंद्र पाटील,  तहसीलदार महेश पवार , पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख  यांनी भेट दिली

 

याप्रसंगी सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले  तहसीलदार  व गटशिक्षणाधिकारी यांनी नागरिकांनी या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय नियमांचे पालन करून स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व समयसुचकता बाळगुण आपली वेळ येईल त्यावेळेस कोवीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.

 

सर्वेक्षण केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांनी पंचक्रोशीतील साकळी, शिरसाड, मनवेल, दगडी, थोरगव्हाण व पिळोदा येथील आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण संदर्भात माहिती दिली. साकळी परिसरातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन होत असलेल्या कोरोना संदर्भातील जनजागृती व रुग्णांची घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती जाणुन घेतली तहसीलदार महेश पवार यांनी समाधान व्यक्त केले  कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनास जनजागृती व शासनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी आणी सर्वेक्षण अधिकाधिक प्रभावी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील सर्वेक्षण कर्मचारी शिक्षक, आशा वर्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content