मू. जे. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य २०२०’ला उत्साहात सुरवात

mj chaitanya 2020

जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन चैतन्य २०२० चे उदघाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकज नन्नावरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या स्नेहसंमेलनात काव्यवाचन कथाकथन, उत्स्फूर्त भाषण, गंमत-जंमत कवितेतून, मुल्जीय न गायक, एकल, युगल, समूहनृत्य, प्रश्‍नमंजुषा, एकांकिका , अंताक्षरी, विविध वेशभूषा, विविध मनोरंजन प्रधान खेळ, ललितकला, विविध छंद आदी स्पर्धा विविध रंगमंचावर पार पडल्या. सर्व स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सकाळी ९वाजता मा.नन्नवरे यांनी ग्रंथालयातील विविध कला प्रदर्शनाचे उद्घाटन रक्तदान शिबीर ,फूड फेस्टिवल यासह पोस्टर प्रदर्शनाचे देखील थाटात उद्घाटन केले .यावेळी मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, ऑटोनॉमस इन्चार्ज डॉ.स.ना.भारंबे , विज्ञान विद्याशाखेच्या प्रमुख प्रा.डॉ.गौरी राणे ,वाणिज्य विद्या शाखा प्रमुख डॉ.ए.पी.सरोदे ,कला शाखेचे प्रमुख डॉ.बी.एन.केसुर ,काळ शाखेचे इन्चार्ज डॉ.दि.एस.इंगळे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.सुरेखा पालवे ,वाणिज्य शाखेचे प्रमुख वाय.ए.सैंदाणे आदी उपस्थित होते.

ग्रंथालयातील काळ प्रदर्शनात फुलांचा गालीचा ,संस्कार भारती ,ठिपक्यांची रांगोळी,मुक्त हस्त रांगोळी,व्यक्ती चित्रण रांगोळी या प्रकारातील आकर्षक व सुंदर रांगोळी विद्यार्थ्यांनी रेखाटल्या होत्या. बेटी बचाव -बेटी पढाओ यासारख्या विविध सामाजिक संदेश देणार्‍या रांगोळ्या एकच लक्ष वेधून घेत होत्या. यासह फ्रूट डेकोरेशन ,पूजा थाळी सजावट ,नाणी-तिकीट इत्यादींचे संकलन ,अरेबिक मेहंदी,पारंपारिक मेहंदी ,केशभूषा ,पेंटिंग रेखाचित्र ,निसर्गचित्र ,पोट्रेट व्यक्ती चित्रण ,सलाद डेकोरेशन या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सर्वांचेच आकर्षण असलेल्या फूड फेस्टीवलला यंदा विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यात पाणीपुरी ,दहीपुरी,मसाला चाट ,मासला पापड ,मटकी भेळ,बनारसी पान,खमंग खुसखुशीत मुग्दलीची भजी,खानदेशातील प्रसिद्ध सातपुड्याच्या पातोळ्या,कळणा-भाकरी, इडली,बर्गर ,यासह केळीच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक खमंग ,इडली,तसेच बिटपासून तयार केलेले पौष्टीक लाडू,वविध आरोग्यदायी ज्यूस याचे एकोणचाळीस ते चाळीस स्टॉल लावण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रज्ञा जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समिती प्रमुख प्रा.डॉ.उज्वला भिरुड ,प्रा.गायत्री खडके,कॉमर्स विभाग , विशाखा पाटील, मायक्रोबायोलॉजी, सचिन चन्नावत, मायक्रोबायोलॉजी, किरण बारी, कॉमर्स, प्रा. हेमलता पाटील, प्रा. डॉ. संगीता पाटील, कॉम्पुटर विभाग, जनसंवाद व पत्रकारिता विभागाच्या प्रा. केतकी सोनार आदी उपस्थित होते. तसेच रेडक्रॉस व मू.जे.महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी रेडक्रॉसचे स्वप्नील वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.शांताराम सोनवणे,वीरेंद्र बिर्‍हाडे,रुपाली बडगुजर,गीतांजली कुवर,अन्वर खान ,रविंद्र जाधव उपस्थित होते.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०१९ मध्ये विविध क्षेत्रात स्पर्धांमध्ये, परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारोह २८ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. पारितोषिक वितरण प्रथितयश उद्योजक वासुदेव महाजन यांच्या हस्ते केले जाणार आहे. स्नेह संमेलनादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Protected Content