Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत चौघे जखमी

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्यासह मुलगा व पुतणी गंभीर जखमी झाल्याची घटना यावल तालुक्यातील हिंगोणागावाजवळील स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी शनिवारी २३ एप्रिल रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, दिलीप अमृत झांबरे (वय-४२) रा. चिनावल ता. रावेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता ते पत्नी लतिका झांबरे, मुलगा राज झांबरे आणि पुतणी रिधी झांबरे असे चौघे (एमएच १९ बीएस १५८८) ने हिंगोणा येथून चिनवल येथे घरी येत होते. दरम्यान हिंगोणा गावातील स्मशानभूमीजवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्या धडके दिलीप झांबरे हे गंभीर जखमी झाले तर इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान. शनिवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता योगीता मोहन झांबरे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देविदास सुरदास करीत आहे.

Protected Content