Accident : भरधाव रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याने पायी जात असलेल्या भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला ऑटो रिक्षाची जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यात महिला गंभीर जखमी झाल्या. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, प्रमिला माधव कोळी (वय-५४) रा. डांभूर्णी ता. यावल या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. २० एप्रिल सायंकाळी पायी भाजीपाला विक्री करत असतांना ऑटो रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू २३७९) ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्रमिला कोळी ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारी २३ एप्रिल रोजी महिलेच्या फिर्यादीवरून ऑटोरिक्षेवरील अज्ञात चालकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

Protected Content