अश्लिल हावभाव करत तरूणीचा विनयभंग करणारा अटकेत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागातील तरूणीशी अश्लिल हावभाव करत हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात येवून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ही कामाच्या निमित्ताने १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पायी जात असतांना संशयित आरोपी अजय विनोद नाडे हा लघूशंका करत महिलेकडे पाहून अश्लिल हावभाव केले. तर मला तुझ्याशी शारिरीक संबंध ठेवायचे आहे असे सांगून तरूणीचे दोन्ही हात पकडून विनयभंग केला. तरूणीने त्याचे दोन्ही हात झटकून पळत घरी गेली. याप्रकरणी शनिवारी २३ एप्रिल रोजी दुपारी संशयित आरोपी अजय नाडे यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अजय नाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

Protected Content